कृत्रिम तलावामुळे उद्यानाची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृत्रिम तलावामुळे उद्यानाची दुरवस्था
कृत्रिम तलावामुळे उद्यानाची दुरवस्था

कृत्रिम तलावामुळे उद्यानाची दुरवस्था

sakal_logo
By

धारावी, ता. १४ (बातमीदार) : संत कक्कया मार्गावरील रावबहाद्दूर एन. शिवराज उद्यान येथे पालिकेतर्फे गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनवण्यात आला होता. दीड दिवसाच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनापासून अनंतचतुर्दशीपर्यंत कृत्रिम तलावाचा स्थानिक रहिवाशांना फायदा झाला; मात्र त्यानंतर उद्यानातील तलावाचे साहित्य काढणे अपेक्षित असताना पाच दिवस उलटून गेल्यावरही तलावाचे साहित्य उद्यानात पडून आहे. त्‍यामुळे उद्यानाची दुरवस्‍था झाली आहे.
या उद्यानातून जवळपासच्‍या शाळांतील विद्यार्थी व स्थानिक रहिवासी ये-जा करतात; मात्र उद्यानात तलावाचे साहित्य तसेच असल्‍याने येथून जाणे मुश्कील झाले आहे. येथे असलेल्‍या साहित्‍यावर विद्यार्थी व लहान मुले खेळत असतात. यामुळे एखाद्या मुलाला दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठेकेदाराने कृत्रिम तलावाचा वापर संपल्यावर लगेचच त्याचे साहित्य उद्यानातून हलवणे अपेक्षित असताना त्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. उद्यानातील कृत्रिम तलावाचे साहित्य तातडीने हलवून उद्यान दुरुस्त करून खेळण्यासाठी मोकळे केले जावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96849 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..