जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न चित्र प्रसारीत करणाऱ्या करमुसेवर दोषारोपपत्र दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न चित्र प्रसारीत करणाऱ्या करमुसेवर दोषारोपपत्र दाखल
जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न चित्र प्रसारीत करणाऱ्या करमुसेवर दोषारोपपत्र दाखल

जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न चित्र प्रसारीत करणाऱ्या करमुसेवर दोषारोपपत्र दाखल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १४ : समाज माध्यमावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र प्रसारित करणाऱ्या अनंत करमुसे यांच्याविरोधात वर्तकनगर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. तसेच या प्रकरणात करमुसे यांच्याकडून तपासकामात कोणतेही साह्य केले नसल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. करमुसे यांनी दाखल केलेली याचिकाही स्वच्छ हेतूने केली नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. करमुसे याचे ट्विट आणि फेसबुक पोस्ट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेबाहेर असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे करमुसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
अनंत करमुसे यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न अवस्थेतील मॉर्फ केलेले छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी ६ एप्रिल २०२० रोजी भादंवि २९२, ५०० तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६६ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आहे. तसेच अनंत करमुसे याला समन्स बजावण्यात आला आहे. या आरोपपत्रात पोलिसांनी करमुसे याच्या वर्तणुकीवर ताशेरे ओढले आहेत. करमुसे याच्या जप्त केलेल्या फोनमध्ये डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र सापडले होते; मात्र असे असतानाही करमुसे याने पोलिसांना तपासात कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. आरोपी करमुसे याने स्वतःच्या मोबाईल फोनमधून स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा एडिट केलेला अर्धनग्न अवस्थेतील अश्लील फोटो अपलोड करून प्रसिद्ध केला असल्याने सदरचा मोबाईल फोन जप्त करून फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला असता जातिद्वेष-धर्मद्वेष, व्यक्तिद्वेष आदी २७ प्रकारचे द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट करमुसे याने आपल्या वैयक्तिक अकाऊंटवरून फेसबुक व ट्विटरवर अपलोड केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान, यासंदर्भात अनंत करमुसे यांच्याशी मोबाईलवर वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96870 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..