Mumbai : नाल्यालगतच्या बांधकामांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai
नाल्यालगतच्या बांधकामांची तपासणी

Mumbai : नाल्यालगतच्या बांधकामांची तपासणी

ठाणे : गेल्या आठवड्यात सलग तीन ते चार दिवस मुसळधार पावसाने शहरातील डोंगर भागातून पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेली माती आणि मोठे दगड नाल्यांमध्ये अडकल्याचे दिसून आले होते. तसेच या पाण्याच्या प्रवाहामुळे नाल्यांच्या भिंती पडून त्यालगतची माती खचू लागली. यामुळे नाल्यालगतच्या वस्त्यांमधील घरे धोकादायक झाली आहेत. या घरांमधील नागरिकांना स्थलांतरित करण्याबरोबरच तेथील बांधकामांची तपासणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिका परिसरात वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, कळवा-मुंब्रा भागात डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात वस्त्या आहेत. या वस्त्यांमधूनच डोंगरातून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पालिकेने नाल्यांची निर्मिती करण्यात आली नाही. या नाल्याच्या भिंतीला लागूनच वस्त्यांमधील घरे असून याठिकाणी पावसाळ्यात नाल्याचे पाणी शिरण्याचे प्रकार घडतात. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने शहरातील अनेक नाल्यांच्या भिंतीची दुरुस्ती, तसेच नालेसफाईची कामे केली होती. गेल्या आठवड्यात गेले तीन दिवस सलग अतिवृष्टी झाली होती. गुरुवारी अवघ्या अर्ध्या तासात ७१ मिमी पाऊस झाला. यामुळे वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, कळवा आणि मुंब्रा या भागांमधील डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने त्यासोबत माती आणि मोठे दगड वाहून आले. हे दगड आणि माती नाल्यांमध्ये जागोजागी अडकून पडल्यामुळे नाल्यांची उंची कमी होऊन पाण्याचा प्रवाह मिळेल त्या मार्गाने पुढे गेला. या पाण्याच्या प्रवाहासोबत कळव्यातील भास्करनगरमधील एक चार वर्षांचा मुलगा वाहून गेला होता.

महापालिका प्रशासनाकडून इमारत रिकामी
डोंगरालगत असलेल्या वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, कळवा आणि मुंब्रा या भागांमधील रस्ते आणि गल्ल्यांना नदीचे रूप आले होते. या पाण्याच्या प्रवाहामुळेच अनेक ठिकाणी नाल्याच्या भिंतीही पडल्या असून त्यालगतची माती खचू लागली आहे. अशाचप्रकारे महात्मा फुलेनगर येथील इमारतीला लागूनच असलेल्या नाल्याची भिंतही पडली. या घटनेमुळे इमारतीच्या तळाची माती निघून गेल्याने खांब दिसू लागले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने ही इमारत रिकामी केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96871 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..