कॅमेरामनवर गर्दूल्यांचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅमेरामनवर गर्दूल्यांचा हल्ला
कॅमेरामनवर गर्दूल्यांचा हल्ला

कॅमेरामनवर गर्दूल्यांचा हल्ला

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः चेंबूरच्या टिळकनगर भागातील पेस्तम सागर, वाल्मीकी नगर येथील एका टीव्ही कॅमेरामनवर गर्दुल्ल्यांनी मंगळवारी रात्री प्राणघातक हल्ला केला. मोहन दुबे असे या कॅमेरामनचे नाव असून सध्या त्याला उपचारार्थ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोर या घटनेनंतर फरार झाले आहेत; मात्र त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली.
चेंबूर जय भवानी सेवा संघ, सीकेबी बँकेजवळ काल रात्री आपल्या आईची ऑनलाईन मागवलेली औषधे येणार असल्याने मोहन दुबे हे वाट पाहत उभे होते. त्या वेळी पाठीमागून येऊन युसुफ बरकत शेख याच्यासह इतर नशाबाजांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यात ते जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भागात अनेक जण एकत्र येऊन नशा करत असतात. त्यामुळे काही दिवसांपूर्वी दुबे यांनी त्यांना हटकले होते. त्याचा राग धरून हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.

राग मनात ठेवून हल्‍ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फरार आरोपी हा गेल्या १५ दिवसांपूर्वी त्याच्या मित्रांसोबत पेस्तम सागर रोड नंबर पाच येथे गांजा पीत असताना फिर्यादी दुबे यांनी त्यांच्या परिसरात गांजा पिऊ नका म्हणून त्यांना हटकले होते. त्या वेळी या आरोपींनी त्यांना धमकी दिली होती. त्यानंतर तोच राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादी यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने जखमी केले. याबाबत टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत; मात्र आमचा शोध सुरू आहे. त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे सुनील काळे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96880 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..