दमण बनावटीचा दारू साठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दमण बनावटीचा दारू साठा जप्त
दमण बनावटीचा दारू साठा जप्त

दमण बनावटीचा दारू साठा जप्त

sakal_logo
By

मनोर, ता. १४ (बातमीदार) : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेली परराज्यातील विदेशी मद्याची वाहतूक करणारी कार जप्त करण्यात आली आहे. या कारमधून १० बॉक्समध्ये ८८ बल्क लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत चार लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी पहाटे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस गावच्या हद्दीत पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. दुर्वेस जिल्हा परिषद शाळेच्या मागच्या बाजूला सापळा रचून किशोर श्रीरंग गुळवे (वय २८) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील कारमधून १० बॉक्समध्ये परराज्यातील ८८ बल्क लिटर विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त मद्यसाठा केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेलीच्या खानवेल येथील एका अनोळखी इसमाकडून खरेदी केल्याची माहिती अटक आरोपीने दिली. आरोपी किशोर श्रीरंग गुळवे याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) ९८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96890 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..