महासचिवपदी सुनील सावर्डेकर यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महासचिवपदी सुनील सावर्डेकर यांची निवड
महासचिवपदी सुनील सावर्डेकर यांची निवड

महासचिवपदी सुनील सावर्डेकर यांची निवड

sakal_logo
By

खारघर, ता. १४ (बातमीदार) : खारघरमधील घरकुल वसाहतीत वास्तव्य करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील सावर्डेकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती समितीच्या महासचिवपदी नुकतीच निवड झाली आहे. ही निवड ऑल इंडिया काँग्रेस अनुसूचित समितीचे अध्यक्ष राजेश लिलोथिया यांनी जाहीर केली आहे. या निवडीबद्दल सावर्डेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मूळचे कळवंडे येथील सुनील सावर्डेकर हे मुंबईत काही वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. याची दखल घेऊन पक्षाने त्यांची काँग्रेसच्या अनुसूचित जाती समितीच्या समन्वयकपदी नेमणूक केली. मागील वर्षी जुलै महिन्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीत सावर्डेकर यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता. या पदाला आपण प्रामाणिकपणे निर्णय देण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96899 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..