मी जनतेचा सेवक आहे, नागरिकांच्या प्रश्नास उत्तर देण्यास तयार : आमदार गणपत गायकवाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मी जनतेचा सेवक आहे, नागरिकांच्या प्रश्नास उत्तर देण्यास तयार : आमदार गणपत गायकवाड
मी जनतेचा सेवक आहे, नागरिकांच्या प्रश्नास उत्तर देण्यास तयार : आमदार गणपत गायकवाड

मी जनतेचा सेवक आहे, नागरिकांच्या प्रश्नास उत्तर देण्यास तयार : आमदार गणपत गायकवाड

sakal_logo
By

कल्याण, ता. १४ (बातमीदार) : मी जनतेचा सेवक आहे, माझ्या कल्याण पूर्वमधील जनता असो वा लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना मी उत्तर देण्यास तयार आहे, असे प्रतिपादन कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केले.
बुधवार सकाळी कल्याण पूर्वमधील पालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरामध्ये नागरिक आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यामध्ये खुल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते नागरिकांच्या प्रश्नाला उत्तरे देत होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणाले, की मी जनतेचा सेवक असून मला कल्याण पूर्वमधील जनता असो वा लोकप्रतिनिधी हे कुठेही बोलावून प्रश्न विचारू शकतात; त्यांना उत्तर देण्यास तयार आहे. जनतेच्या प्रश्नाला उत्तर देण्यास आणि समस्या दूर करण्यासाठी बांधील असल्याचे या वेळी गायकवाड यांनी स्पष्ट केले.
या वेळी कल्याण पूर्वेतील प्रलंबित तसेच झालेली विकासकामे, ठेकेदारांच्या कामाची पद्धत, पोलिस ठाणे, गुन्हेगारी, सामाजिक समस्या, खेळाची मैदाने अशा जवळपास १२ प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आरटीआय कार्यकर्ते विनोद तिवारी यांनी विचारलेल्या प्रश्नाला या वेळी आमदार गणपत गायकवाड यांनी पाठपुराव्याच्या प्रतींसह उत्तरे दिली. महाविकास आघाडी सरकारमुळे कामे रखडत होती, पण आता शिंदे-भाजप सरकारच्या काळात कामे होतील, असा आशावाद त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96909 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..