जीएसटी कर्मचारी संकुलाचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीएसटी कर्मचारी संकुलाचे लोकार्पण
जीएसटी कर्मचारी संकुलाचे लोकार्पण

जीएसटी कर्मचारी संकुलाचे लोकार्पण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ ः करचुकवेगिरीला पायबंद घालण्यासाठी अधिकाऱ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर करावा, गरज पडल्यास त्याचे प्रशिक्षण घ्यावे, असा मौलिक सल्ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला. खारघर येथे केंद्रीय वस्तू व सेवा कर मंत्रालयातर्फे रहिवासी संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलाचे निर्मला सीतारामन यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

याप्रसंगी बोलताना सीतारामन यांनी केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या मुंबई झोनच्या अधिकाऱ्यांचे विक्रमी वसुलीचे कौतुक केले. सेंट्रल इंटेलिजेन्स युनिट टीमने डेटा विश्लेषणाद्वारे मोठ्या प्रमाणात करचुकवेगिरी करणाऱ्या ग्राहकांची चोरी पकडून विक्रमी वसुली केल्याबाबत सीतारामन यांनी प्रशंसा केली. तसेच कोविडसारख्या महामारीच्या काळातही ज्यादा खर्चाची बचत करून दर्जेदार गृहसंकुल उभारल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला विभागाकडून नीटनेटके आणि स्वच्छ निवासस्थान मिळणे ही काळाची गरज आहे, परंतु चांगल्या शहरांमध्ये अशा सुविधा मिळत नसल्याने कर्तृत्ववान अधिकारी मोठ्या शहरांमध्ये जाण्यास नकार देतात; मात्र आता खारघरसारख्या ठिकाणी दर्जेदार घरे उपलब्ध केल्यामुळे केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागातील अधिकारी मन लावून काम करतील, अशी अपेक्षा केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी व्यक्त केली. कर चुकवून सरकारची फसवणूक करणाऱ्यांना शोधून काढण्यात सीआययूच्या पथकाने मोठी कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय महसूल सचिव तरुण बजाज यांनी प्रशंसा केली. जीडीपीमध्ये ७ टक्के आणि परकीय व्यापारात ४० टक्के मुंबईचे योगदान आहे. मुंबई कस्टम झोन २५ टक्के आणि मुंबई सीजीएसटी १८ टक्के जीएसटी महसूल देते, असे सीबीआयसीचे अध्यक्ष विवेक जोहरी यांनी सांगितले. याप्रसंगी केंद्रीय प्रशासन सदस्य आणि सीबीआयसीच्या सुंगीता शर्मा, प्रधान मुख्य आयुक्त सीजीएसटी मुंबई झोनचे अशोक कुमार मेहता, सीबीआयसीचे वरिष्ठ अधिकारी आणि सीजीएसटी मुंबई झोनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी निर्मला सीतारामन यांच्या हस्ते विविध श्रेणीतील अधिकाऱ्यांना स्टाफ क्वार्टर्सच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.

सीजीएसटी परिसर गृह प्रकल्प
----
खारघर येथे तयार केलेल्या सीजीएसटी परिसर गृहप्रकल्पाचे निश्चित केलेल्या वेळेपेक्षा १४ महिन्यांत काम पूर्ण झाले. ११० कोटी रुपये खर्चाचा अंदाजित प्रकल्प असताना १० कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत करून प्रकल्प पूर्ण झाला. सर्व वर्गांतील १८७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96919 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..