भाजप पदाधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप पदाधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा
भाजप पदाधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

भाजप पदाधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

sakal_logo
By

भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर भाजपच्या सृष्टी मंडळाचा बूथ संयोजक नवीन सिंग याच्यावर काशीमिरा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेला लग्नाच्या भूलथापा दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा व महिलेचे अश्लील छायाचित्र दुसऱ्याच्या मोबाईलवर पाठवून बदनामी केल्याचा आरोप सिंग याच्यावर आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पतीशी वाद असल्यामुळे ती आपल्या मुलीसह स्वतंत्र राहत होती. सुमारे दीड वर्षापूर्वी तिची नवीन सिंग याच्याशी समाजमाध्यमावर ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर नवीन सिंग याने महिलेचा तिच्या मुलीसह सांभाळ करण्याचे आणि मिरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक झाली की लग्न करण्याच्या भूलथापा मारत; तर अनेक वेळा पीडितेची इच्छा नसतानाही सिंग याने तिच्याशी संबंध ठेवले. या संबंधांतून पीडित महिला गर्भवती झाल्यामुळे सिंग याने तिला जबरदस्तीने गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. दरम्यान, महिलेने सिंग याला लग्नाविषयी विचारले असता त्याने लग्न करण्यास नकार देत शारीरिक संबंध ठेवले नाही तर पीडितेचे अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच सिंग याने त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्याच्या मोबाईलवर महिलेचे छायाचित्र पाठवले. त्यामुळे पीडित महिलेने काशीमिरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे; मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96921 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..