एलटीटी-मडगाव गाडीच्या वेळेत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एलटीटी-मडगाव गाडीच्या वेळेत बदल
एलटीटी-मडगाव गाडीच्या वेळेत बदल

एलटीटी-मडगाव गाडीच्या वेळेत बदल

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव साप्ताहिक एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करून वारंवारता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एलटीटी-मडगाव साप्ताहिक एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एलटीटी-मडगाव साप्ताहिक एक्स्प्रेस ४ नोव्हेंबरपासून दर मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री १२.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता पोहोचेल. दर मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मडगाव येथून दुपारी १२.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्री ११.२५ वाजता पोहोचेल. या दोन्ही गाड्या ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांत थाबणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96922 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..