झवेरी बाजारात ईडीची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झवेरी बाजारात ईडीची कारवाई
झवेरी बाजारात ईडीची कारवाई

झवेरी बाजारात ईडीची कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १४ : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज मुंबईतील झवेरी बाजारात चार ठिकाणी छापेमारी करत सराफा व्यापाऱ्याकडून ९२ किलो सोने आणि ३३० किलो चांदी जप्त केली आहे. रक्षा बुलियन आणि क्लासिक मार्बल्स या कंपन्यांशी संबंधित ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. मे. पारेख अल्युमिनेक्स लिमिटेड प्रकरणातील मनी लॉण्डरिंग प्रकरणाचा या कारवाईशी संबंध आहे. यापूर्वी ईडीने मनी लॉण्डरिंग प्रकरणात गुन्हाही नोंदवला होता.

ईडीच्या झडतीदरम्यान परिसरात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. मे. रक्षा बुलियनच्या या खासगी लॉकर्सची झडती घेतली असता ९१.५ किलो सोने आणि १५२ किलो चांदी सापडली. या वेळी दोन लॉकरही ताब्यात घेण्यात आले असून, यातील अतिरिक्त १८८ किलो चांदी जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत ४७.७६ कोटी आहे. याप्रकरणी ईडीकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मे. पारेख अल्युमिनेक्स कंपनीने ८ मार्च २०१८ रोजी बँकांना फसवून २२९६.५८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर विविध कंपन्यांच्या माध्यमातून लेअरिंग करून पैसे पाठवले होते. यात असुरक्षित कर्ज आणि गुंतवणूक हक्क प्रदान करण्याच्या, कर्ज घेण्यासंदर्भात कोणतेही करार झालेले नाहीत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96924 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..