स्वयंपुनर्विकाला मुंबई बँकेचे साह्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वयंपुनर्विकाला मुंबई बँकेचे साह्य
स्वयंपुनर्विकाला मुंबई बँकेचे साह्य

स्वयंपुनर्विकाला मुंबई बँकेचे साह्य

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ ः मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी पुन्हा अर्थपुरवठा सुरू करण्याचा निर्णय मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. स्वयंपुनर्विकास करणाऱ्या इमारतींना बिल्डरने देऊ केलेल्या जागेपेक्षा दीडपट जास्त जागा मिळेल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.
या निर्णयामुळे मुंबईतील हजारो गृहनिर्माण संस्थांमधील लाखो रहिवाशांना दिलासा मिळेल. रिझर्व्ह बँकेने या अर्थसाह्यावर घातलेली बंदी दरेकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने उठवली गेल्याने या अर्थसाह्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई बँकेच्या अर्थसाह्याच्या माध्यमातून होणाऱ्या या स्वंयपुनर्विकास योजनेच्या अंतर्गत शांताप्रभा सोसायटीला विकासकाच्या ऑफरपेक्षा ५३ टक्के जागा सदस्यांना जादा मिळणार आहे. चारकोप अभिलाषा सोसायटीला १४२ टक्के; तर चारकोप श्वेतांबरा सोसायटीला ५० टक्के जागा जादा मिळणार आहे. मुंबईतील सुमारे ४० हजार गृहनिर्माण संस्था या स्वयंपुनर्विकास योजनेच्या प्रतीक्षेत असून या योजनेमुळे त्यांना नवसंजीवनी मिळेल. आतापर्यंत १६०० गृहनिर्माण संस्थांनी स्वयंपुनर्विकासासाठी मुंबई बँकेकडे अर्थपुरवठ्याची मागणी केली आहे, असेही दरेकर म्हणाले.

असा होतो व्‍यवहार
गृहनिर्माण सोसायट्यांना स्वयंपुनर्विकास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विक्रीयोग्य एफएसआयच्या माध्यमातून मिळणारी नफ्याची रक्कम ही काही प्रमाणात सोसायट्यांच्या सदस्यांना देण्यात येते; तर विक्रीयोग्य घरे बँकेकडे गहाण ठेवण्यात येतात व या फ्लॅटच्या विक्रीतून मिळणारी रक्कम अर्थपुरवठ्याच्या कर्जफेडीसाठी वापरली जातात. यापूर्वीही मुंबई बँकेमार्फत स्वयंपुनर्विकासासाठी १६ गृहनिर्माण संस्थांना आर्थिक मदत करण्यात आली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96945 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..