ओला दुष्काळ जाहीर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओला दुष्काळ जाहीर करा
ओला दुष्काळ जाहीर करा

ओला दुष्काळ जाहीर करा

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. १५ (बातमीदार) : मासेमारीला सुरुवात होऊनही मध्येच मुसळधार पाऊस, कधी ऊन तर कधी दमट हवामान यामुळे खोल समुद्रात जाऊनही मासे जाळ्यात सापडत नाहीत. त्यामुळे मच्छीमारांचे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा व मच्छीमारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी मच्छीमार असोसिएशनने केली आहे.
वर्षभरात पावसाळ्याचे चार महिने मासेमारीला बंदी असते. ऑगस्ट महिन्यात नारळी पौर्णिमेपासून मच्छीमारांनी मासेमारीस सुरुवात केली, मात्र मासे मिळत नाहीत. मासे मिळत नसल्याने रिकाम्या हाताने मच्छीमारांना परतावे लागत आहे. शिवाय लागणारे इंधन, जाळी व इतर साहित्य याचेही खूप नुकसान होत असल्याची खंत मच्छीमारांनी व्यक्त केली. पालघर, मुरबा, येडवण, कोरे डहाणू, अर्नाळा, वसई या भागात हीच परिस्थिती आहे. मच्छीमार बोटी खोल समुद्रात नेऊनही मासे मिळत नाहीत. त्‍यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी केली आहे.

दुष्काळाचे निकष सरकारने बदलण्याची गरज आहे. आज जर एका भागात मासे मिळाले तर अन्य भागात मासे मिळतीलच असे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना दुष्काळाचे निकष लावावेत.
- डॉ. गजेंद्र भानजी, अध्यक्ष, नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96946 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..