खारघरमधील रस्ते दुर्गंधीमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमधील रस्ते दुर्गंधीमुक्त
खारघरमधील रस्ते दुर्गंधीमुक्त

खारघरमधील रस्ते दुर्गंधीमुक्त

sakal_logo
By

(सकाळ इुम्पॅक्ट लोगो वापरणे)

खारघर, ता. १५ (बातमीदार) ः खारघर वसाहतीतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या तुंबल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेने सक्शन पंप लावून वाहिन्यांची साफसफाई सुरू केली आहे. त्यामुळे रस्त्यांवरील मलमिश्रित पाण्याच्या समस्येपासून खारघरकरांची सुटका झाली आहे.
खारघर सेक्टर सोळा सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सहा पंप बंद असल्याने ‘खारघरमधील रस्त्यावर मलमिश्रित पाण्याचे लोट’ अशा आशयाची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर सिडकोच्या उपअभियंता ताटे यांनी तातडीने सांडपाणी प्रक्रिया केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेत पनवेल पालिकेच्या मलनिस्सारण वाहिन्यांचे काम पाहणारे ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांसोबत वास्तुविहार, सेलिब्रेशन परिसर, तसेच रस्त्यावर तुंबलेल्या मलनिस्सारण वाहिन्यांची सक्शन पंप लावून सफाईला सुरुवात केल्यामुळे मलमिश्रित पाण्याच्या समस्येतून खारघरकरांची सुटका झाली आहे.

कोट -
सेक्टर सोळा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सहा पंप बंद असल्यामुळे सेक्टर १५, १६, १७, १८, १९ वसाहतीत रस्त्यावर सांडपाणी येत आहे. सिडको आणि पालिकेच्या माध्यमातून बंद असलेले पंप सुरू करण्यासाठी पालिका आयुक्त आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठपुरावा सुरू आहे.
- संजना कदम, माजी नगरसेविका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96954 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..