प्लेग, लेप्टोस्पायरोसिसचा पनवेलकरांना धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लेग, लेप्टोस्पायरोसिसचा पनवेलकरांना धोका
प्लेग, लेप्टोस्पायरोसिसचा पनवेलकरांना धोका

प्लेग, लेप्टोस्पायरोसिसचा पनवेलकरांना धोका

sakal_logo
By

कामोठे, ता. १५ (बातमीदार) : प्लेग, लेप्टोस्यायरोसिसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि राष्ट्रीय स्वच्छता सर्वेक्षण अभियानात अग्रक्रम प्राप्त करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा मूषक नियंत्रण कार्यक्रम राबवण्याकडे कल वाढत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रामधील जीर्ण इमारती, झोपडपट्टी, बाजारपेठ येथे उंदरांचा प्रादुर्भाव असताना प्रशासन मात्र मूषक नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणीकडे कानाडोळा करत आहे.
पावसाळ्यात उंदरांमुळे प्लेग, लेप्टोस्पायरोसिस आणि संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका असतो. पनवेल महापालिका क्षेत्रामधील शहरातील झोपडपट्टी, जीर्ण इमारती, भाजी मंडई, मटण-मच्छीविक्रेत्यांची दुकाने, गावातील चाळीमध्ये उंदरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पनवेल महानगरपालिकेची आमसभा सुरू असताना उंदराने गोंधळ घातला होता. घरातील, हॉटेलमधील, हातगाडीवरील उरलेले अन्नपदार्थ सार्वजनिक ठिकाणी फेकण्यामुळे उंदराना सहज खाद्य मिळत असून रोगराईला आमंत्रण दिले जात आहे. वाहनांची वायर कुरतडल्यामुळे नागरिकांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यामुळे माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांनी मूषक नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र महापालिकेने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही.
------------------------------------
एजन्सी नेमण्याच्या हालचाली
मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिकेत मूषक नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. उंदीर पकडण्यासाठी विषारी औषधे व पिंजरा यांचा वापर केला जातो. पनवेल महापालिका क्षेत्रात उंदरांचा प्रादुर्भाव, तक्रारी नाहीत. त्यामुळे मूषक नियंत्रण कार्यक्रमासाठी महापालिकेकडून एजन्सी नेमण्याचा विचार सुरू असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
उंदरांमुळे रोगराईला निमंत्रण दिले जात आहे. झोपडपट्टी विभागात उंदराच्या त्रासामुळे नागरिक हैराण आहेत; पण महापालिका मूषक नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी दुर्लक्ष करत आहे.
- डॉ. सुरेखा मोहोकर, माजी नगरसेविका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96959 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..