वराळा तलाव परिसर स्वच्छ करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वराळा तलाव परिसर स्वच्छ करणार
वराळा तलाव परिसर स्वच्छ करणार

वराळा तलाव परिसर स्वच्छ करणार

sakal_logo
By

भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ पर्यंत स्वच्छ अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शहरातील वराळदेवी तलाव परिसर, उद्यान या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या निमित्ताने तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेचे आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी केले आहे.

इंडियन स्वच्छता लीगमार्फत १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस हा सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी माहिती दिली. याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत आयुक्त बोलत होते. या लीगमध्ये शहरांमध्ये स्वच्छता स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये युवा क्लब, एनएसएस, एनसीसी, तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होऊ शकतात. भिवंडी शहराच्या संघाचे नाव भिवंडी ब्रिगेड म्हणून ओळखले जाणार आहे. या स्पर्धेत युवक आणि स्वयंसेवकांनी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत पालिका आरोग्य विभाग यांच्याकडे १७ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96964 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..