विजेअभावी डिजिटल शिक्षणाची पाटी कोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेअभावी डिजिटल शिक्षणाची पाटी कोरी
विजेअभावी डिजिटल शिक्षणाची पाटी कोरी

विजेअभावी डिजिटल शिक्षणाची पाटी कोरी

sakal_logo
By

राज वैशंपायन​​​​

नागोठणे, ता. १४ : रायगड जिल्‍हा परिषदेच्या नागोठणे केंद्रात साधारणपणे १८ प्राथमिक शाळा असून ४३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र सोयी-सुविधांअभावी विद्यार्थ्यांची परवड होत आहे.
१८ शाळांपैकी सहा शाळा अंधारात आहेत. काही शाळांमध्ये मीटर आहे, मात्र शाळांनी बिल न भरल्‍याने वीज खंडित आहे, तर काही शाळांचे वीजबिल शिक्षक भरतात. गेल्‍या अनेक वर्षांपासून असा प्रकार सुरू असून वरिष्‍ठांपुढे बोलता येत नसल्‍याचे शिक्षकांचे म्‍हणणे आहे. काही शाळांची थकबाकी असल्‍याने महावितरणने मीटर काढून नेले आहेत. त्‍यामुळे पर्याय म्‍हणून ग्रामपंचायतीच्या मीटरचा वापर सुरू असल्‍याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्‍हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे एकलघर, लावेची वाडी, भापक्याची वाडी या शाळा डिजिटल म्‍हणून नोंद असली तरी सद्यस्‍थितीत त्‍या मीटरविना सुरू आहेत. विशेष म्हणजे या शाळा आदिवासीबहुल भागातील आहेत.
नागोठणे क्रमांक १, निडी, पिंपळवाडी या शाळांचे वीजबिल थकीत आहे, तर जोगेश्वरीनगर नागोठणे, शेतपळस, वासगाव या शाळांचे वीजबिल जिल्‍हा परिषदेने सादिल अनुदानातून (शिक्षकांना शालेय खर्चासाठी मिळणारी रक्‍कम) भरले आहे.
लोकवर्गणीतून नागोठणे क्रमांक १, नागोठणे कन्याशाळा, मिरनागर उर्दू शाळा, निडी शाळांचा वीज भरणा करण्यात येतो; तर लोकवर्गणी व व्यवस्थापन समितीमार्फत नागोठणे उर्दू शाळेचा भरणा केला जातो.
राज्य विधान मंडळाच्या अधिवेशनात रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांची वीज खंडित केल्‍याप्रकरणी शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पत्राद्वारे माहिती दिली होती.

सध्या पुण्यात ट्रेनिंग करता आली आहे, याबाबतची नेमकी वस्तुस्थितीचा आढावा घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्‍यानंतर योग्‍य निर्णय घेऊ.
- पुनीता गुरव, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद रायगड

नागोठणे केंद्रातील शाळांना ४% सादिल रक्‍कम अनुदान स्‍वरूपात देण्यात येते. आतापर्यंत केवळ ४ ते ५ शाळांनाच हे अनुदान अदा करण्यात आले आहे. बाकी शाळांची वीजबिल अदा करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे.
- मेघना धायगुडे, गटशिक्षण अधिकारी, रोहा

आदिवासी समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हा प्रगतीचा मूळ आधार आहे. त्‍यामुळे ग्रामीण, दुर्गम भागातील शाळांमध्ये सोयी-सुविधांबरोबरच डिजिटल शिक्षण मिळणे अपेक्षित आहे, मात्र संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्‍यांची गैरसोय होत आहे.
- गोविंद रामा शिद, तालुकाध्यक्ष, आदिवासी समाज रोहा

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96972 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..