आदीशक्तीच्या आगमनाचे वेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदीशक्तीच्या आगमनाचे वेध
आदीशक्तीच्या आगमनाचे वेध

आदीशक्तीच्या आगमनाचे वेध

sakal_logo
By

तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या धामधुमीनंतर आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहे. कोरोनामुळे सलग दोन वर्षे अनेक नवरात्र मंडळांनी उत्सव रद्द केले होते. मात्र, यंदा कोरोना रुग्णसंख्येचा पट गतवर्षीपेक्षा उतरल्याने तसेच शासनाने कोरोना नियम शिथिल केल्याने मंडळांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून कार्यशाळेतील मूर्तिकारांची लगबग वाढली आहे.
आदिशक्तीच्या स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज झाले आहेत. नवी मुंबई परिसरातील मूर्ती शाळेतील मूर्तीकारांची लगबग सुरू आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून, रंगरंगोटी करण्याचे काम सध्या जोमाने सुरू झाले आहे. दुर्गा , भवानी, महिषासूर मर्दिनी, कालिका माता, रेणुका, सप्तश्रृंगी माता, वैष्णव देवी अशी देवीचे विविध रूपे मूर्तिकारांनी साकारली आहेत. गणेशोत्सवानंतर लगेच नवरात्र येत असल्याने देवीच्या मूर्ती घडवण्यासाठी देवीची विविध रूपे साकारली जात आहेत. त्यात डोळे, चेहरा, हास्य आदी कामे फार बारकाईने करावी लागत असल्याने मूर्तिकार दिवसरात्र कामाला लागले आहेत.
---------------------------------------------
नवरात्रोत्सव मंडळांकडून चांगला प्रतिसाद
कोरोनामुळे मूर्तींची उंची चार फुटांपर्यंत मर्यादित होती. यंदा, मात्र उंचीबाबत कोणतेही निर्बंध नसल्याने पूर्वीसारख्याच ८ ते १२ फुटापर्यंतच्या मूर्ती साकारण्यात आलेल्या आहेत. घरगुतीदेखील मूर्तींना मागणी वाढली आहे. मूर्तींच्या किमती दीड हजारापासून २५ हजार रुपयांपर्यंत असून दोन वर्षांच्या तुलनेत यंदा बुकिंग जोरात सुरू आहे.
-----------------------------------------------------
यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, नारळाचा काथ्या, मजुरी आदींमध्ये वाढ झाल्याने यंदा मूर्तीचे भावही २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या दोन वर्षांत देवीच्या मूर्ती मर्यादीत संख्येतच होत्या. यंदा. मात्र त्यात वाढ झाली आहे.
- संतोष चौलकर, मूर्तिकार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96983 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..