सांडपाण्याच्‍या दुर्गंधीपासून सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांडपाण्याच्‍या दुर्गंधीपासून सुटका
सांडपाण्याच्‍या दुर्गंधीपासून सुटका

सांडपाण्याच्‍या दुर्गंधीपासून सुटका

sakal_logo
By

कांदिवली, ता. १५ (बातमीदार) ः आदर्श नगर विभागात गेले आठ दिवस मलनिस्सारण वाहिनीतून सांडपाणी बाहेर पडत होते. चाळीमध्ये समोरासमोर घरे आणि अरुंद मार्ग असल्याने दुपारच्या वेळेस सांडपाणी मधल्या मार्गात साचत होते. यामुळे नागरिक हैराण झाले होते. दुय्यम अभियंता समीर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता अक्षय जोशी यांनी संपूर्ण वाहिनी स्वच्छ करून घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आदर्श नगरमधील मुख्य मलनिस्‍सारण वाहिनीत अडथळा निर्माण झाल्याने येथील चेंबर गेल्या ८ दिवसांपासून दुपारच्या वेळी भरून वाहत होते. स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले; मात्र मार्ग निघाला नाही. चाळीमध्ये दुर्गंधी पसरत होती. स्थानिक कार्यकर्ते गजानन गवई यांनी याबाबत पालिका अधिकारी अक्षय जोशी यांच्याकडे तक्रार केली असता दुय्यम अभियंता समीर सानप यांनी तातडीने वर्सोवा विभागाला कळविले. बुधवार, १४ सप्टेंबर रोजी वर्सोवा विभागाचे फिटर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली येथील मलनिस्सारण वाहिनी साफ केली. यामुळे आदर्श नगर मधील १३५ कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96986 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..