विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

sakal_logo
By

धारावी, ता. १५ (बातमीदार) : धारावीतून माहीम पश्चिमेतील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. येथील पादचारी पुलावर चढण्या-उतरण्यासाठी असलेले जिने निमुळते व अरुंद असल्याने येथे चेंगराचेंगरी होण्याची भीती व्‍यक्‍त होत आहे.
या भागात पूर्वी रेल्वेचे फाटक होते. फाटक बंद झाल्यावर पादचाऱ्यांसाठी पूल बनवण्यात आला होता. रेल्वेवरील पूल नादुरुस्त झाल्यावर पूल पाडण्यात आला. त्या जागी पूल उभारावा, यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले होते. त्याची दखल घेत धारावीतून माहीम स्थानकाकडे येणाऱ्या पुलाला जोडून रेल्वेवर पादचारी पूल उभारला आहे. या पुलावरून धारावीतील विद्यार्थी माहीम पश्चिम येथील शाळेत व महाविद्यालयात शिक्षणासाठी जातात. पादचारी पुलावर चढण्या-उतरण्यासाठी असलेले जिने निमुळते व अरुंद असल्याने शाळेत-महाविद्यालयात जाणारे व शाळेतून महाविद्यालयातून परतणाऱ्या विद्यार्थ्यांची वेळ एकच असल्याने जिन्यावर पालकांची व विद्यार्थ्यांची चेंगराचेंगरी होत आहे. चेंगराचेंगरीमुळे एखादी दुर्दैवी घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. माहीम दिशेला उतरणाऱ्या पुलाच्या जिन्याजवळ सीसीटीव्ही कॅमरे उभारले आहेत. त्याचा खांब व विजेचा खांब असल्याने अरुंद जिन्यावरून उतरणे व चढणे जिकिरीचे झाले आहे.

रस्‍ता ओलांडणेही आव्‍हानात्‍मक
माहीम पश्चिम येथील के. जी. खिलनानी शाळा व कनिष्ठ महाविद्याल, खलिफा झियाउद्दीन मुलींची प्राथमिक शाळा, मनपा शाळा येथे शिक्षण घेण्यासाठी धारावीतील शेकडो विद्यार्थी जातात. विद्यार्थ्यांना माहीम पश्चिमेतील सेनापती बापट मार्ग ओलांडून जावा लागतो. या ठिकाणी वाहतूक पोलिस नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. पादचारी पुलावर किंवा रस्त्यावर कसलीही सुरक्षा नसल्याने विद्यार्थ्यांचे किरकोळ अपघात होत असतात. एखादी मोठी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी होत आहे.

नवा पूल सुरू करावा
जवळच रस्त्यावरून जाण्यासाठी पादचारी पूल उभारण्यासाठी पुलाचा सांगाडा उभारण्यात आला आहे. अनेक महिन्यांपासून नवा पादचारी पूल बांधण्याची प्रतीक्षा केली जात आहे. जर हा नवा पूल लवकरात लवकर चालू केल्यास विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट कमी होण्यास मदत होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96989 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..