Mumbai : २८ फुटी फ्लेमिंगोच्या शिल्पाचा राष्ट्रीय विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flamingo
२८ फुटी फ्लेमिंगोच्या शिल्पाचा राष्ट्रीय विक्रम

Mumbai : २८ फुटी फ्लेमिंगोच्या शिल्पाचा राष्ट्रीय विक्रम

नवी मुंबई : नेरूळ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथे उभारण्यात आलेल्या फ्लेमिंगोच्या शिल्पाची बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डसमध्ये नोंद झाली. विशेष म्हणजे ही शिल्पाकृती टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरातील अनेक चौकांमध्ये टाकाऊ वस्तूंचा वापर करून आकर्षक शिल्पाकृती साकारण्यात आलेल्या आहेत. नवी मुंबईचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गानजीकच्या सेक्टर २६ नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून २८.५ फुटांची भव्य फ्लेमिंगो शिल्पाकृती साकारण्यात आलेली आहे.

ही शिल्पाकृती २८.५ फूट अर्थात ८.७० मीटर उंचीची असून ३.९ फूट उंचीच्या चौथऱ्यावर बसवण्यात आलेली आहे. १.५ टन वजनाची ही रेखीव फ्लेमिंगो शिल्पाकृती अत्यंत लक्षवेधी आहे. त्यामुळे या टाकाऊतून टिकाऊ आकर्षक फ्लेमिंगो शिल्पाकृतीस देशातील सर्वांत उंच टाकाऊ धातूंच्या यंत्रभागाद्वारे बनवलेली शिल्पाकृती म्हणून बेस्ट ऑफ इंडिया या नामांकित संस्थेने राष्ट्रीय विक्रमी प्रमाणपत्र प्रदान केले आहे.

टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापरावर भर

स्वच्छतेमध्ये नेहमीच मानांकन उंचाणारे शहर, असा नवी मुंबईचा नावलौकिक असून नागरिकांच्या सहभागातून नवी मुंबई शहरात सातत्याने नानाविध उपक्रम राबवले जातात. स्वच्छतेमधील थ्री आर ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्याकडे महापालिकेने विशेष लक्ष दिले आहे. याअंतर्गत कचरानिर्मितीत घट, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर व कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यात येत आहे. शहर सुशोभीकरणामध्ये टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर या संकल्पनेचा अत्यंत प्रभावी वापर करण्यात आला.

या राष्ट्रीय विक्रमामुळे नवी मुंबईची ‘फ्लेमिंगो सिटी’ ही ओळख राष्ट्रीय स्तरावर मुद्रांकित झालेली आहे. याद्वारे नवी मुंबईच्या नावलौकिकात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96993 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..