पदपथांवर भूमाफिया खाली करतात मातीचे ट्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदपथांवर भूमाफिया खाली करतात मातीचे ट्रक
पदपथांवर भूमाफिया खाली करतात मातीचे ट्रक

पदपथांवर भूमाफिया खाली करतात मातीचे ट्रक

sakal_logo
By

जीवन तांबे
चेंबूर, ता. १५ ः उपनगरातील झेडानगर, मानखुर्द लिंक मार्ग, चिमणी उद्यान, अन्य रहदारी कमी असलेल्या मार्गावरील फुटपाथवर भूमाफिया रातोरात मातीचे भरलेले ट्रक रिकामे करून पसार होत आहेत. याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांप्रमाणे पोलिस व पालिकेला होत असला, तरी या भूमाफियांवर ठोस कारवाई नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
शहरात व उपनगरात विविध ठिकाणी विकसकांची पुनर्विकास व खासगी कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. इमारतीचा पाया टाकण्याकरिता खोदकाम करून बाहेर काढलेली मातीची काही विकसक भूमाफियांच्या मदतीने विल्हेवाट लावतात. या भूमाफियांच्‍या ट्रकचा चालक व त्याचे कामगार मोकळा रस्ता, फुटपाथ, मोठा नाला व खाडी जवळील भाग पाहून ट्रक रिकामा करून पसार होत असल्‍याचे दिसते.
एम पश्चिम विभाग व एल विभाग, चेंबूर पोलिस ठाणे व टिळक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील
झेडा नगर ते मानखुर्द मार्ग, चिमणी उद्यान, सायन पनवेल मार्गावरील स्वस्तिक चेंबर्स तसेच सायन घाटकोपर मार्गावरील अमर महल, सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड येथे हे ट्रक रिकामे केले जात असल्‍याचे दिसून येत आहे.

चिमणी गार्डन परिसरातील पदपथांवर ढिगारे
सायन–पनवेल मार्गावरील डायमंड गार्डन समोरच चिमणी गार्डन आहे. येथे पहाटे व रात्रीच्‍या सुमारास रहदारी नसते. याचाच भूमाफिया फायदा घेऊन बिनधास्त मातीचा भरलेला ट्रक पदपथावर तर कधी रस्त्यामध्येच खाली करून पसार होतात. याचा त्रास नागरिकांना होतो. यासंदर्भात तक्रार केल्‍यानंतर पालिका अधिकारी व कामगार पुन्हा ती माती उचलून दुसऱ्या ठिकाणी विल्हेवाट लावतात. या घटना थांबाव्‍यात यासाठी चेंबूर परिसरातील सर्व मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. तसेच लवकरात लवकर अशा भूमाफियांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या स्वाती तपासे, विशाल गायकवाड यांनी केली आहे.

पोलिसांच्‍या मदतीची गरज आहे. झेडा नगर, मानखुर्द तसेच चिमणी उद्यान हा महत्त्‍वाचा स्पॉट आहे. रात्री व पहाटे काळोख असल्याने सीसीटीव्हीत ट्रक नंबर दिसत नाही. जर ट्रक सापडले, तर त्यांना १० ते २० हजार रुपयांचा दंड बसवला जातो. येथे टाकलेली माती आम्ही उचलतो.
– दीपक मदने, सहायक अभियंता, पालिका एम पश्चिम

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96997 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..