वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी कसली कंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी कसली कंबर
वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी कसली कंबर

वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी कसली कंबर

sakal_logo
By

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. १५ : पालघर जिल्ह्यात ३४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी मोट बांधली आहे; तर भाजप आणि शिंदे गटाने युतीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे यावेळची ग्रामपंचायत निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे.
आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणुका या स्थानिक पातळीवरच लढल्या गेल्या आहेत. मात्र राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींमुळे यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा ट्रेंड बदलला आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंडाचा झेंडा उभारून स्वंतत्र चूल मांडली आहे. या बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर दोन महिन्यातच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. पालघर जिल्ह्यात ४७३ पैकी ३४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १३ ऑक्टोबर होत आहेत. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्याच्या दृष्टीने जव्हारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षासह तसेच बहुजन विकास आघाडीचे तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे. बैठकीत या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर भाजपच्या जिल्हाध्यांनी शिंदे गटाशी युती करून, निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत वाढवली आहे. जव्हारमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पालघर जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, सीपीएमचे जिल्हा सचिव किरण गहला, बविआचे तालुकाध्यक्ष एकनाथ दरोडा उपस्थित होते.

........
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी झाली आहे. तालुका पातळीवर काही अडचणी निर्माण झाल्यास आम्ही सहभाग घेऊन त्या सोडविणार आहोत. शिवसेना या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरली आहे.
- वैभव संख्ये, शिवसेना पालघर जिल्हाध्यक्ष

पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, माकप आणि बविआ एकत्र आले आहेत. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढली जाणार आहे. बहुजन विकास आघाडीने तालुकास्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याने ग्रामीण भागात बविआ महाविकास आघाडीत आली आहे. सर्वच तालुक्यात आघाडीत एकवाक्यता आहे.
- सुनील भुसारा, आमदार व राष्ट्रवादी पालघर जिल्हाध्यक्ष

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96998 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..