रानशेत शाळेत ‘चित्ता’बद्दल जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रानशेत शाळेत ‘चित्ता’बद्दल जनजागृती
रानशेत शाळेत ‘चित्ता’बद्दल जनजागृती

रानशेत शाळेत ‘चित्ता’बद्दल जनजागृती

sakal_logo
By

कासा, ता. १५ (बातमीदार) : चित्ता हा प्राणी १९५२ पासूनच भारतातून नामशेष झाला आहे. आफ्रिकेतून आठ चित्ते, त्यात ५ नर व ३ मादी भारतात आणल्या जाणार आहेत. त्यांना मध्य प्रदेशमधील कुनो व्याघ्र प्रकल्पात सोडले जाणार आहे. याचाच एक जनजागृतीचा भाग म्हणून जिल्हा परिषद शाळा रानशेत येथे डहाणू सामाजिक वनीकरण विभागामार्फ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वनक्षेत्रपाल नवीन माच्छी यांनी संपूर्ण चित्ता या उपक्रमाची माहिती दिली; तर शाळेचे मुख्याध्यापक संजीव सावकारे यांनी अन्न साखळीची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, वनरक्षक एस समारंभ व एम. सोनवने व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमात २०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97020 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..