दोन अल्पवयीन मुलींची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन अल्पवयीन मुलींची सुटका
दोन अल्पवयीन मुलींची सुटका

दोन अल्पवयीन मुलींची सुटका

sakal_logo
By

पालघर, ता. १५ (बातमीदार) : अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या अशोक जैन यास पालघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पालघर शहरामध्ये एका फ्लॅटवर पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले असून बोईसर येथील दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक लालचंद जैन हा पालघर शहरात राहत असून तो पालघरमधील एका फ्लॅटमध्ये हा वेश्याव्यवसाय चालवत होता. बोईसर येथील दोन अल्पवयीन मुलींना आणून त्यांना जैनने व्यवसायासाठी प्रवृत्त केले होते. ही माहिती पालघर पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक उमेश पाटील व त्यांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकून या दोन्ही अल्पवयीन मुलींची सुटका करून त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवले आहे. या प्रकरणात अशोक जैन याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमासह बालकांचे लैंगिक अत्याचार कायद्यानुसार व इतर कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. सत्र न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत जैन याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97037 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..