कल्याण-डोंबिवली पालिकेचे ट्विटर अकाउंट हॅक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण-डोंबिवली पालिकेचे ट्विटर अकाउंट हॅक
कल्याण-डोंबिवली पालिकेचे ट्विटर अकाउंट हॅक

कल्याण-डोंबिवली पालिकेचे ट्विटर अकाउंट हॅक

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १५ ः कल्याण-डोंबिवली महापालिकेचे समाज माध्यमावरील अधिकृत संकेतस्थळ असलेले ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. हॅकरने ट्विटरवर १०० मॅसेज केले. संदेश व्हायरल होऊन एक तासाचा कालावधी उलटला तरी पालिका प्रशासन त्याबाबत अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हॅकरने बिट क्वॉईनमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचे संदेश व्हायरल करण्यात आले. हॅकरने ट्विटर हॅक करून तासाचा कालावधी उलटला तरी त्याविषयी पालिका अधिकाऱ्यांना मात्र काहीच माहिती नसल्याचे दिसून आले. एका जागरूक नागरिकाने पालिकेचे अकाऊंट हॅक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांची एकच धावपळ सुरू झाली. पालिकेचे सायबर सेल हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्वरित ट्विटर अकाऊंट रिस्टोअर करत पुन्हा नव्याने सुरू केले. या वृत्ताला कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनीदेखील दुजोरा दिला आहे.
विटालिक एथ या नावाने अज्ञात व्यक्तीने हे खाते ताब्यात घेत क्रिप्टो करन्सीची जाहिरात करणारी पोस्ट केली. प्रत्येक ५ सेकंदाला ही पोस्ट अशा तब्बल १०० पोस्ट त्याने केल्या.
...
गुन्हा दाखल; तपास सुरू
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने बाजारपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत याचा तपास सुरू केला आहे.
...
पालिकेचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे सकाळी निदर्शनास आले होते. तातडीने ते पुन्हा रिस्टोअर करण्यात आले. त्यावरील ट्विट डिलिट करण्यात आली आहेत. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. भाऊसाहेब दांगडे, आयुक्त

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97058 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..