मानखुर्दमध्ये शिवसेनेचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानखुर्दमध्ये शिवसेनेचे आंदोलन
मानखुर्दमध्ये शिवसेनेचे आंदोलन

मानखुर्दमध्ये शिवसेनेचे आंदोलन

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १५ (बातमीदार) ः वेदांत ग्रुप तसेच फॉक्सकॉन हे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या निषेधार्थ मानखुर्दमध्ये गुरुवारी (ता. १५) आंदोलन करण्यात आले. अणुशक्ती नगर विधानसभेच्या शिवसेना तसेच युवासेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. स्थानिक शाखाप्रमुख किसान टिकेकर व रोहिदास ढेरंगे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात आमदार प्रकाश फातर्पेकर व माजी आमदार तुकाराम काते सहभागी झाले होते. हातात निषेधाचे फलक घेऊन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्‍यान, मानखुर्द स्थानकासमोरील शिवसेना शाखेबाहेर गुरुवारी दुपारी आंदोलन केले. त्या वेळी सरकारच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. सायंकाळी पीएमजीपी वसाहतीतील पोलिस चौकीसमोर माजी नगरसेविका समीक्षा सक्रे तसेच उप विभागप्रमुख गोपाळ सारंग यांच्या नेतृत्वात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97066 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..