‘तेजस’च्या व्हिस्टाडोम कोचमधून कोकणची सौंदर्य सफर मुंबई-करमळी प्रवासादरम्यान निसर्ग न्याहाळण्याची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘तेजस’च्या व्हिस्टाडोम कोचमधून कोकणची सौंदर्य सफर

मुंबई-करमळी प्रवासादरम्यान निसर्ग न्याहाळण्याची संधी
‘तेजस’च्या व्हिस्टाडोम कोचमधून कोकणची सौंदर्य सफर मुंबई-करमळी प्रवासादरम्यान निसर्ग न्याहाळण्याची संधी

‘तेजस’च्या व्हिस्टाडोम कोचमधून कोकणची सौंदर्य सफर मुंबई-करमळी प्रवासादरम्यान निसर्ग न्याहाळण्याची संधी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १५ : मुंबई ते करमळी ‘तेजस’ एक्स्प्रेसला प्रथमच व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. त्यानुसार आज ही एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. मुंबई-मडगाव विभागातील हा दुसरा व्हिस्टाडोम कोच आहे. विशेष म्हणजे मुंबई-करमळी तेजस एक्स्प्रेसचा विस्तार मडगाव जंक्शनपर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना व्हिस्टाडोम कोचद्वारे निसर्गसौंदर्य न्याहाळता येणार आहे.
मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव (क्रमांक १२०५१/१२०५२) ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेसला एक व्हिस्टाडोम कोच आधीच जोडलेला आहे. मध्य रेल्वे एकूण पाच व्हिस्टाडोम कोच चालवत असून तेजस एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम कोच जोडल्याने ही संख्या आता सहावर पोहोचली आहे. मुंबई-करमळी (क्र. २२११९/२२१२०) तेजस एक्स्प्रेसला १५ सप्टेंबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत (पावसाळी वेळापत्रकानुसार) व्हिस्टाडोम कोच जोडला जाणार आहेत. या कोचचे सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर बुकिंग सुरू झाले आहे.

तेजस एक्स्प्रेसचा विस्तार
मुंबई-करमळी तेजस एक्स्प्रेस (क्र. २२११९) १ नोव्हेंबर २०२२ पासून दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ५.५० ला सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २.४० वाजता मडगावला पोहोचेल; तर करमळी येथून सुटणारी ट्रेन क्र. २२१२० तेजस एक्स्प्रेस दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी १ नोव्हेंबर २०२२ पासून मडगाव येथून दुपारी ३.१५ वाजता (करमळी २.४० वाजता) सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या दोन्ही एक्स्प्रेसना दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ आणि करमळी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

या एक्स्प्रेसना व्हिस्टाडोम कोच
१) मुंबई-मडगाव ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेस
२) मुंबई-पुणे ‘डेक्कन’ एक्स्प्रेस
३) मुंबई-पुणे डेक्कन क्विन
४) मुंबई-पुणे ‘प्रगती’ एक्स्प्रेस
५) पुणे-सिकंदराबाद ‘शताब्दी’ एक्स्प्रेस

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97068 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..