ओमिक्रॉनचे सर्व २८८ नमुने पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओमिक्रॉनचे सर्व २८८ नमुने पॉझिटिव्ह
ओमिक्रॉनचे सर्व २८८ नमुने पॉझिटिव्ह

ओमिक्रॉनचे सर्व २८८ नमुने पॉझिटिव्ह

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १५ : कोरोनाला रोखण्यात पालिकेला यश येत असले, तरी कोरोनाचा उपप्रकार ओमिक्रॉन विषाणूचा धोका कायम आहे. जिनोम सिक्वेसिंगचा १५ व्या फेरीतील अहवाल गुरुवारी आरोग्य विभागाने प्रसिद्ध केला. या अहवालानुसार २८८ नमुन्यांची तपासणी केली असता १०० टक्के रुग्ण ओमिक्रॉनचेच आढळल्याचे समोर आले आहे. १२ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत हे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, बीए २.७५ , बीए २.७५.१, बीए २.७५.२ व्हेरिएंटच्या २८३ रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईत बीए व्हेरिएंटची चिंताही कायम आहे.

मुंबईत ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव आहे का, याची तपासणी करण्यासाठी पालिकेने कस्तुरबा रुग्णालयात ऑगस्ट २०२१ पासून चाचणीला सुरुवात करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत जिनोम सिक्वेसिंगच्या १५ फेऱ्या झाल्या आहेत. त्यात गुरुवारी १५ व्या फेरीच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात तपासणीसाठी पाठवलेल्या २८८ पैकी सर्वच रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळले. या २८८ बाधितांपैकी २०२ रुग्णांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत; तर दोन रुग्णांनी लशीची एकच मात्रा घेतली आहे; तर ८४ रुग्णांनी लसच घेतली नसल्याचे अहवालातून समोर आले आहे. कोरोनाचा धोका टळला असला, तरी नागरिकांनी हात स्वच्छ धुवावेत, गर्दीत जाणे टाळणे यांसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

२८८ नमुन्यांचे विश्लेषण
व्हेरिएंट नमुने
बीए.२.७५ १०६
बीए.२.७५.१ ९६
बीए.२.७५.२ ६०
बीए.५.२ ०६
बीजे.१ ०६
बीए.२.७६ ०४
बीए.२ ०३
बीएच.१ ०२
बीए.२.१०.४ ०१
बीए.२.७४, ०१
बीए.५.१, ०१
बीई.१ ०१
बीई.३ ०१

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97077 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..