नायर रुग्णालयामध्ये आयसीसीयूच्या ११ खाटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नायर रुग्णालयामध्ये आयसीसीयूच्या ११ खाटा
नायर रुग्णालयामध्ये आयसीसीयूच्या ११ खाटा

नायर रुग्णालयामध्ये आयसीसीयूच्या ११ खाटा

sakal_logo
By

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात आपत्कालीन परिस्थितीत येणाऱ्या रुग्णांसाठी विशेष ‘आयसीसीयू’ कक्ष सुरू करण्यात आला आहे. एमजीएल अर्थात महानगर गॅसच्या सहकार्याने आपत्कालीन रुग्णांसाठी विशेष कार्डिओलॉजी विभागही नुकताच सुरू करण्यात आला आहे. एमजीएलकडून यासाठी जवळपास १.७९ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

नायरच्या कार्डिओलॉजी विभागाला १० मटेरियल डेफिब्रिलेटर्स, २१ मल्टिपॅरा मॉनिटर्स, १० अत्याधुनिक ईसीजी मशिन्स, २० तात्पुरते पेसमेकर जनरेटर्स, १ एसीटी मशीन, ५० फॉलर बेड्स विथ मेट्रस, १० हायड्रॉलिक ट्रॉली, २० मिट्रल वॉल्व्होप्लास्टी बलून्स या निधीतून देण्यात आले आहेत. रुग्णालयात कार्डिओलॉजी विभाग सुरू झाल्याने हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांना याचा फायदा होईल, असे नायर रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. ए. एस. चौरासिया यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कार्डिओलॉजी विभाग ७ एप्रिलला तयार झाल्यानंतर माजी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते; मात्र इतर उर्वरित कामांमुळे हा विभाग सुरू करण्यात आला नव्हता. आता हा कक्ष सुरू झाला असल्याची माहिती रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. प्रवीण राठी यांनी दिली.

‘एनसीडी कॉर्नर’ही सुरू
नायर रुग्णालयात असंर्सगजन्य आजारांच्या तपासणीसाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आले आहे. पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईक-हितचिंतकांचे रक्तदाब व रक्तातील साखरेची मोफत तपासणी केली जाईल. यासाठी पेपर काढण्याची आवश्यकता नाही. या उपक्रमामुळे मधुमेह व उच्च रक्तदाबाचे लवकर निदान होऊन वेळीच उपचार सुरू होतील. या बाह्यरुग्ण विभागाला एनसीडी कॉर्नर असे संबोधण्यात येत असून, जन औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ऋजुता हाडये या कार्यभार पाहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97118 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..