रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवार, १८ सप्टेंबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे - सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाऊन धीमा मार्ग
कधी - सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम - सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या लोकल सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सर्व लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. पुढे पुन्हा डाऊन मार्गावर वळवल्या जातील; तर घाटकोपर येथून अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.

ट्रान्स हार्बर
कुठे - ठाणे-वाशी/नेरूळ अप-डाऊन
कधी - सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम - ठाणे येथून वाशी/नेरूळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून ठाणेकरिता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहतील. ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत हार्बर/मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.

पश्चिम रेल्वे
कुठे - चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्ग
कधी - सकाळी १०.३५ ते पहाटे ३.३५
परिणाम - अप-डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत; तर अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल सेवा रद्द असणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97156 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..