बसची कारला धडक; चार जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बसची कारला धडक; चार जण जखमी
बसची कारला धडक; चार जण जखमी

बसची कारला धडक; चार जण जखमी

sakal_logo
By

कासा, ता. १६ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचा आंबोली येथे भीषण अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसने आंबोली येथे उभ्या असलेल्या इको गाडीला मागून येत जोरदार धडक दिली. हा अपघात संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात इको गाडी जागीच उलटी झाली. या कारमधील सात जणांपैकी चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यात मिताली पंचनिया, किरण कांबडी, मोहोम्मद सलमान हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गवर वाढत्या अपघातामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97157 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..