शेअरबाजार आपटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेअरबाजार आपटले
शेअरबाजार आपटले

शेअरबाजार आपटले

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. १६ ः आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअरबाजारात मोठी घसरण बघायला मिळाली. सेन्सेक्स १,०९३ अंशांनी घसरून ५८,८४० वर स्थिरावला; तर निफ्टी ३४६ अंशांनी घसरून १७,५३० वर बंद झाला. सेन्सेक्सच्या ३० पैकी २९ शेअर्समध्ये घसरण झाली.
निफ्टीच्या इंड्सइंड बँक आणि सिप्लाचे शेअर्स तेजीत होते; तर टाटा कंझ्युमर, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, ग्रासीम, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी लाईफ आणि एम अँड एम या शेअर्सचे भाव मोठ्या प्रमाणात पडले. जागतिक संकेतांमध्ये कमकुवतपणा दिसल्याने देशांतर्गत बाजारात शेअर्सची विक्री झाली.
एनएसईच्या सर्व ११ सेक्टर्स इंडेक्समध्ये घसरण झाली. सर्वात जास्त घसरण माध्यम क्षेत्रात ४.०७ टक्के इतकी झाली. आयटी आणि रिॲलीटी क्षेत्रात ३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. त्यानंतर ऑटो, मेटल आणि पीएसयू बँकेत २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण नोंदवली गेली. बँक, वित्तीय सेवा, एफएमसीजी आणि फार्मा सेक्टर यात १ टक्का इतकी घसरण झाली; तर खासगी क्षेत्रात १ टक्क्यांपेक्षा कमी घसरण नोंदवली गेली.
------
कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअरबाजारात ही घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज प्रमुख आशियाई बाजारातही विक्री झाली. याआधी अमेरिकी बाजारही घसरणीसह बंद झाले. अमेरिकेत गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97158 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..