मिरा भाईंदरला पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा भाईंदरला पावसाने झोडपले
मिरा भाईंदरला पावसाने झोडपले

मिरा भाईंदरला पावसाने झोडपले

sakal_logo
By

भाईंदर, ता. १६ (बातमीदार): मिरा-भाईंदरमध्ये झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी तुंबले. मात्र कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
गुरुवारी मध्यरात्रीपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. आज सकाळी मात्र पावसाने चांगलाच जोर धरला, त्यामुळे भाईंदर पश्चिम येथील बेकरी गल्ली, मिरा रोड येथील गीता नगर, शांती नगर, हटकेश आदी सखल भागांत पाणी तुंबले. तळमजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे चांगलेच हाल झाले. याशिवाय मुंबई-अहमदाबाद मार्गावरील घोडबंदर फाउंटन हॉटेल नाक्याजवळही रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतूक विस्कळित होऊन ती मंदगतीने सुरू होती. शहरात कोणत्याही अनुचित प्रकाराची नोंद झाली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97160 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..