गौतम अदाणी जगातील दुसरे श्रीमंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौतम अदाणी जगातील दुसरे श्रीमंत
गौतम अदाणी जगातील दुसरे श्रीमंत

गौतम अदाणी जगातील दुसरे श्रीमंत

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. १६ ः भारतीय उद्योगपती गौतम अदाणी आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. त्यांची संपत्ती १५४.७ अरब डॉलर म्हणजे जवळपास १२.३४ लाख कोटी रुपये इतकी आहे. फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकून ते फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनियर्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. आशियाई व्यक्ती फोर्ब्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गौतम अदाणी हे या यादीत फक्त एलन मस्क यांच्यापेक्षा मागे आहेत. टेस्लाचे संस्थापक एलन मस्क हे २१.८३ लाख कोटी संपत्तीचे मालक आहेत. बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती १२.२७ लाख कोटी, तर जेफ बेजोस यांची संपत्ती ११.९५ लाख कोटी इतकी आहे. अदाणी यांच्याशिवाय भारतीय उद्योगपती रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी हे जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती ७.३५ लाख कोटी इतकी आहे.

केवळ १७ दिवसांपूर्वीच अदाणी जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. त्यांनी २०२२ या चालू वर्षात आपल्या संपत्तीत ७८.२ बिलीयन डॉलरची वाढ केली आहे. ही वाढ जवळपास पाचपट इतकी आहे. फेब्रुवारीतच त्यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकले होते.
अदाणी ४ एप्रिल रोजी सेंटी बिलेनियर्सच्या यादीत सामील झाले होते. १०० बिलीयन डॉलरपेक्षा जास्त नेटवर्थ असणाऱ्या लोकांना सेंटी बिलेनियर्स म्हटले जाते. एक वर्षापूर्वी एप्रिल २०२१ मध्ये अदाणींचे नेटवर्थ ५७ अरब डॉलर इतके होते. २०२१-२२ या आर्थिक वर्षात अदाणींची संपत्ती जगात सर्वात जास्त वेगाने वाढली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97162 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..