उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ
उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ

उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ

sakal_logo
By

बदलापूर, ता. १६ (बातमीदार) : परतीच्या पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरातील उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, नदीजवळील चौपाट पाण्याखाली गेल्याने प्रशासन अलर्टच्या भूमिकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने बदलापूर शहराला झोडपून काढले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, पुराची भीती सध्या शहरात व्यक्त केली जात आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने, नदी किनारी असलेली चौपाटी देखील पाण्याखाली गेली असून, या ठिकाणी पालिका व पोलिस प्रशासन अलर्टच्या भूमिकेत आहेत. या ठिकाणी सामान्य नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पुढे जर असाच पाऊस कोसळत राहिला तर पुराचा धोका ओळखून पालिका प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97164 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..