ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान मोदी ठाण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान मोदी ठाण्यात
ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान मोदी ठाण्यात

ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान मोदी ठाण्यात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १६ : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला मुख्यमंत्रिपद मिळाले. त्यामुळे जिल्ह्याचे महत्त्व वाढले असून शिवसेना शिंदे गटासह भाजपने जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अशातच कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. १६ ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ केला जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदे गट आणि भाजप शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ठाणे महापालिकेला रुस्तमजी गृहसंकुलातील हा भूखंड टाऊन सेंटर या आरक्षणाच्या विकासातून प्राप्त झाला आहे. कोरोना काळात या टाऊन सेंटरच्या ठिकाणी ग्लोबल कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्यानंतर कोरोना कमी झाल्यानंतर याच ठिकाणी किंबहुना येथील जागा कमी पडत असल्याने बाजूच्या जागेवर टाटा मेमोरिअल आणि जितो या संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ३० वर्षांचा करारदेखील करण्यात आला आहे. यातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने येथे कॅन्सर रुग्णालय उभारण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी जितो या संस्थेच्या वतीने पंतप्रधान विभाग कार्यालयाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून काही अंतिम कळवण्यात आलेले नाही. मात्र मोदी येणार असल्याने या जागेची पाहणीदेखील पोलिस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या ठिकाणी १ लाख नागरिकांची व्यवस्था करण्यासाठीच्या हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. दरम्यान, येत्या काही महिन्यात जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुका लागणार असल्यानेही या निमित्ताने शिंदे गट आणि भाजप शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

….........................
दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदी ठाण्यात येणार
काही वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच मोदी हे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी ठाण्यात आले होते. त्यानंतर आता २०२२ मध्ये म्हणजेच ऑक्टोबर १६ रोजी ते ठाण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या कामाच्या शुभारंभासाठी येणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97168 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..