परतीच्या पावसाने जोर हेटवणे धरण १०० टक्के भरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परतीच्या पावसाने जोर हेटवणे धरण १०० टक्के भरले
परतीच्या पावसाने जोर हेटवणे धरण १०० टक्के भरले

परतीच्या पावसाने जोर हेटवणे धरण १०० टक्के भरले

sakal_logo
By

पेण, ता. १६ (वार्ताहर) : पेण तालुक्यासह शहरात मागच्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले असून शेतीचेही फार मोठे नुकसान झाले आहे. काल रात्रीपासूनच पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केली. त्यामुळे शहरासह तालुक्याच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले, तर तालुक्यातील हेटवणे धरण १०० टक्के भरून पाण्याची पातळी ८६.१० मी.ली. झाली असल्याने हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणि पाणलोटातील पावसाच्या तीव्रतेनुसार स्पिलवेचे काही दरवाजे थोड्या वेळासाठी उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला; तर भोगावती नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पावसामुळे सकाळच्या सत्रातील शाळा लवकरच सोडण्यात आल्या. मागच्या दहा दिवसांपूर्वी पेण तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे या परतीच्या पावसाने दाणादाण उडवली आहे. पावसामुळे दिवसभर हवेत गारवा निर्माण झाल्याने समाधान वाटत होते; परंतु परतीचा पाऊस असाच सतत पडत राहिल्यास शेतात आलेले चांगले पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97176 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..