मुंबईत खड्ड्यांचे ग्रहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत खड्ड्यांचे ग्रहण
मुंबईत खड्ड्यांचे ग्रहण

मुंबईत खड्ड्यांचे ग्रहण

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १७ (बातमीदार) ः गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने चांगलीच मुसंडी मारल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. त्‍यातच मुंबईकरांना रस्त्यावरील खड्यांतून प्रवास करावा लागत असल्याने मुंबईकरांसाठी खड्ड्यांचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. पावसाच्‍या दमदार हजेरीने पुन्‍हा खड्ड्यांनी डोके वर काढले आहे.
शहरातील रस्ते दुरुस्‍तीसाठी दरवर्षी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र पावसाला सुरुवात होताच खड्ड्यांचे ग्रहण लागते. पूर्वेतील पंतनगर येथील शिवराज चौक येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह सामान्य नागरिकांना अडखळत प्रवास करावा लागत आहे.
मध्यंतरी ईशान्य मुंबईतील खड्ड्यांवरून मनसेने पालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. ‘घाटकोपरकरांना मंगळावर जाण्याची संधी’, अशा आशयाचे आंदोलन करत मनसेने पालिकेचा निषेध व्यक्त केला होता. मात्र त्यानंतर एन वॉर्ड सहायक आयुक्त संजय सोनवणे यांनी दोन आठवड्यात खड्डे बुजवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते; मात्र अद्याप घाटकोपर पूर्वेमधील खड्डे ‘जैसे थे’च दिसत आहेत.

खड्ड्यांबाबत आम्ही मंचमार्फत शंखनाद आंदोलन सुरू केले आहे. मध्यंतरी पालिकेने खड्डे भरलेसुद्धा; मात्र पुन्हा परतलेल्या पावसात खड्डे निर्माण झाले आहेत. कंत्राटदारावर पालिकेने कारवाई करावी. कारण मुळात खड्डेच भरताना कंत्राटदार कामचुकारपणा करत आहेत, हे सध्याच्या पडलेल्या खड्ड्यांवरून स्पष्ट दिसत आहे.
– नित्यानंद शर्मा, अध्यक्ष, आत्म सन्मान मंच

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97187 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..