आयबीए व्यवस्थापकीय समितीवर अतुल खिरवडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयबीए व्यवस्थापकीय समितीवर अतुल खिरवडकर
आयबीए व्यवस्थापकीय समितीवर अतुल खिरवडकर

आयबीए व्यवस्थापकीय समितीवर अतुल खिरवडकर

sakal_logo
By

कल्‍याण, ता. १७ : कल्याण जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवडकर यांची इंडियन बँक्स असोसिएशनच्या व्यवस्थापकीय समितीवर निवड झाली आहे. नागरी सहकारी बँकांमधून अतुल खिरवडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. इंडियन बँक्स असोसिएशन ही देशातील बँकांची एक प्रतिष्ठित संघटना आहे. बँकांच्या विविध श्रेणीतील अनुभवी, तज्ज्ञ आणि ज्येष्ठ व्यक्तीची निवड यावर होते. अतुल खिरवडकर गेली ४२ वर्षांपेक्षा अधिक काळ बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहे. विविध पदांवर काम केलेल्या अतुल खिरवडकर यांचे कल्याण जनता सहकारी बँकेच्या विस्तारात महत्त्वपूर्ण योगदान आहे. बँकिंग विषयातील जाणकार असलेले अतुल खिरवडकर हे अभ्यासू व्याख्याते आहेत. अतुल खिरवडकर यांच्या निवडीबद्दल नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राने आनंद व्यक्त केला आहे. अतुल खिरवडकर यांनी एकमताने झालेल्या निवडीबद्दल आरबीआयचे संचालक सतीश मराठे, टीजेएसबी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे, बसीन कॅथॉलिक बँकेचे एमडी सेकटो फर्गुसो, नागपूर नागरी बँकेचे सुभाष गोडबोले, कालुपूर बँकेचे विनोद दादलानी यांचे आभार मानले आहेत. कल्याण जनता बँकेच्या संचालकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. आपल्या कार्यकाळात नागरी सहकारी बँक क्षेत्राच्या सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करीन, असे अतुल खिरवडकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97189 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..