डोंबिवलीतील आईस फॅक्टरी ते मानपाडा रस्त्याचे कॉंक्रीटीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीतील आईस फॅक्टरी ते मानपाडा रस्त्याचे कॉंक्रीटीकरण
डोंबिवलीतील आईस फॅक्टरी ते मानपाडा रस्त्याचे कॉंक्रीटीकरण

डोंबिवलीतील आईस फॅक्टरी ते मानपाडा रस्त्याचे कॉंक्रीटीकरण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ ः डोंबिवली एमआयडीसीतील आईस फॅक्टरी ते मानपाडा रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वपूर्ण असून या कामासाठी पंधरा दिवस हा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली असल्याची सूचना वाहतूक विभागाने जाहीर केली आहे. पंधरा दिवसांत हे काम पूर्ण करण्याचा मानस पालिका प्रशासनाचा असून गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कामात अडथळे येत आहेत. यामुळे हे काम लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने या रस्त्याच्या कामासाठी ८३ लाखांचा निधी मंजूर करून त्याचा कार्यादेशदेखील काढला. मात्र, तरीही गेली चार वर्षे या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली नव्हती. अखेर या कामास मुहूर्त मिळाला आहे. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याचे काम सुरू करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले होते; परंतु वाहतुकीच्या दृष्टीने काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्‍याने गणेशोत्सवानंतर हे काम सुरू करण्यात आले आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याने वाहतूक विभागाने या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवत ती अन्य मार्गाने वळविली आहे.
वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी या वाहतूक बदलाची अधिसूचना जाहीर केली आहे. बुधवारी मध्यरात्री १२ ते ३० सप्टेंबर मध्यरात्री १२ पर्यंत हे वाहतूक बदल करण्यात आले आहेत. मानपाडा रोडकडून आईस फॅक्टरी चौक मार्गे साईबाबा मंदिर, पाथर्ली, गोग्रासवाडीकडे जाणारी व येणारी वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग वाहनांना दिले असून त्यांनी त्या मार्गाचा वापर करावा असे आवाहन डोंबिवली वाहतूक उप विभागाचे पोलीस निरिक्षक गित्ते यांनी केले आहे.

वाहतूक बदल
मानपाडा रस्त्याने साईबाबा मंदिर मार्गे पाथर्ली-गोग्रासवाडीकडे जाणारी वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांकरिता मानपाडा रोडवरील शिव मंदिराजवळ, आईस फॅक्टरी चौक या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. मानपाडा रस्त्याने साईबाबा मंदिरमार्गे पाथर्ली रस्त्याने गोग्रासवाडीकडे जाणारी सर्व वाहने आईस फॅक्टरी चौकातून मानपाडा रस्त्याने सरळ पुढे जाऊन स्टार कॉलनी, साईबाबा चौक येथे डावीकडे वळण घेऊन इच्छितस्थळी जातील. पाथर्ली गोग्रासवाडीकडून आईस फॅक्टरीमार्गे मानपाडा रस्त्याकडे येणारी वाहतूक साईबाबा मंदिर चौक या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. पाथर्ली गोग्रासवाडीकडून आईस फॅक्टरीमार्गे मानपाडा रस्त्याकडे येणारी वाहने साईबाबा मंदिर चौक, पाथर्ली येथे डावीकडे वळण घेऊन एमआयडीसी रोडने इच्छित स्थळी जातील.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97194 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..