ऐरोलीत अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐरोलीत अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा
ऐरोलीत अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

ऐरोलीत अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

sakal_logo
By

वाशी, ता.१८ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील दिवागावात द्वारकानाथ मढवी यांनी विनापरवानगी इमारतीचे अनधिकृत बांधकाम सुरू केले होते. या बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक कारवाई करण्यात आली.
या बांधकामावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन ‘ब’ नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही संबंधितांनी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवल्याने ऐरोली विभागामार्फत या बांधकामावर धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेसाठी ऐरोली विभागाकडील अधिकारी, कर्मचारी, १ जेसीबी, ८२ मजूर, १ गँस कटर, २ इलेक्ट्रीक हॅमर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते. यावेळी ऐरोली विभागातील अतिक्रमणांवरील कारवाई अशीच सुरू ठेवणार असल्याचे सहाय्यक आयुक्त महेंद्र सप्रे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97208 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..