घरफोडीतील सराईत गुन्हेगाराला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडीतील सराईत गुन्हेगाराला अटक
घरफोडीतील सराईत गुन्हेगाराला अटक

घरफोडीतील सराईत गुन्हेगाराला अटक

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : नवी मुंबईच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोराला गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने अटक केली. संतोष घनघाव (४५) असे या आरोपीचे नाव असून त्याने रबाळे व कोपरखैरणेच्या हद्दीत २० घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ६०२ ग्रॅम वजनाचे २८ लाख ३२ हजार रुपये किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत.
या प्रकरणातील आरोपी संतोष घनघाव हा ठाण्यातील कळवा ब्रिजखालील झोपडपट्टीत राहण्यास असून तो नवी मुंबईतील ऐरोली, रबाळे, घणसोली व कोपरखैरणे भागात रात्रीच्या सुमारास येऊन घरफोडी करून पळून जात होता. घरफोडी केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येणार नाही, याची तो काळजी घेत होता. यासाठी तो सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा ठिकाणावरून रिक्षा पकडून आपल्या घरी निघून जात होता. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र, ऐरोलीत गेल्या महिन्यात झालेल्या घरफोडीत सुमारे सव्वादहा लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन खिशामध्ये ठेवले होते. मात्र, हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने रिक्षाचालकाचा शोध घेऊन आरोपी संतोष घनघावला कळवा ब्रिजखालून अटक केली आहे.

घरफोडीचे १४ गुन्हे दाखल
घरफोडी करण्यात सराईत असलेला संतोष हा एकटाच चोरी करत असून त्याच्यावर यापूर्वी पनवेल तालुका, कळंबोली, तळोजा, खांदेश्वर, रबाळे, कोपरखैरणे पोलिस ठाण्यात १४ चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६; तर कोपरखैरणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ असे एकूण २० घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याच्याकडून २८ लाख ३२ हजार रुपये किमतीचे ६०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, तीन मोबईल फोन व दागिने मोजण्यासाठीचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, असा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97209 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..