खड्डा चुकवताना दुचाकीचा अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डा चुकवताना दुचाकीचा अपघात
खड्डा चुकवताना दुचाकीचा अपघात

खड्डा चुकवताना दुचाकीचा अपघात

sakal_logo
By

मोखाडा, ता. १७ (बातमीदार) : जव्हार-मोखाडा-त्र्यंबकेश्वर हा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याला जोडणारा राज्यमार्ग आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पवारपाड्याजवळ खड्डा चुकवायच्या नादात पोशेरा येथील किराणा व्यापारी संतोष भास्कर पवार (४०) यांच्या दुचाकीचा अपघात झाला आहे. हेल्मेट घातल्याने ते बचावले, मात्र त्यांच्या हाताला मार लागला आहे. मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर दिशादर्शक फलक, किलोमीटर दर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. तसेच साईडपट्टीचे काम ही केलेले नाही. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. अपघातात जीव गमावल्यावर खड्डे भरणार का, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते जयराम वाघ यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97213 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..