कल्‍याण-डोंबिवलीत कचऱ्याविरोधात पालिका आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्‍याण-डोंबिवलीत कचऱ्याविरोधात पालिका आक्रमक
कल्‍याण-डोंबिवलीत कचऱ्याविरोधात पालिका आक्रमक

कल्‍याण-डोंबिवलीत कचऱ्याविरोधात पालिका आक्रमक

sakal_logo
By

कल्याण, ता. १८ (बातमीदार) : केडीएमसी हद्दीतील कचरा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत असून, प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण वाढल्‍याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार कारवाई करूनही नागरिक ऐकत नसल्‍याने पालिका प्रशासन आक्रमक झाले असून, रस्त्यावर कचरा टाकल्यास थेट कायदेशीर कारवाईचा इशारा घनकचरा विभाग उपायुक्त अतुल पाटील यांनी दिला आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील कचरा प्रश्न बिकट झाला असून यामुळे पालिकेवर चोहोबाजूंनी टिकेची झोड उठत आहे. प्रशासनावर टीका झाल्याने आता पालिकेने कंबर कसली असून अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून प्लास्टिक पिशव्या आणि कचरा टाकणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. नागरिकांचे प्रबोधन करूनही अनेक ठिकाणी कचरा टाकला जात आहे. दुसरीकडे परिसरामधील कचरा प्रश्न न सुटल्याने स्वच्छता अधिकारी आणि सहायक आयुक्त यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्‍यात आली असून त्‍यामुळे पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे. कचऱ्याविरोधात आता पालिकेने कठोर कारवाईसाठी पावले उचलली असून, बेशिस्त नागरिकांना वेळीच समज देण्‍यात येणार आहे.
--------------------------------
कोट
पालिका केवळ कागदोपत्रीच स्वच्छता आणि कारवाई करत असून, सरकारी अनुदान आल्‍यावर अधिकारी पुन्‍हा पालिका कार्यालयात बसून कारभार करतील.
- प्रथमेश सावंत, अध्यक्ष, जाणीव सामाजिक संस्था
---------------------------------------------------
१ जून ते १३ सप्टेंबरपर्यंतची कारवाई

महिना प्‍लास्‍टिक जप्‍त (किलोमध्‍ये) दंड (रुपयांमध्‍ये)

जून ५८.६ तीन लाख ९५ हजार

जुलै १०८ किलो दोन लाख २० हजार

ऑगस्ट ६५ किलो २५ हजार

सप्टेंबर १३ किलो ४५ हजार

एकूण २३१ .६ किलो सहा लाख ८५ हजार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97228 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..