आस्था हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आस्था हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी शिबिर
आस्था हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी शिबिर

आस्था हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी शिबिर

sakal_logo
By

मनोर, ता. १७ (बातमीदार) : रोटरी क्लब आणि एसएमबीटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. १६) मनोरच्या आस्था हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीनाथ तालेकरी यांनी १०२ रुग्णांची तपासणी केली. हृदयासंबंधी गंभीर तक्रारी असलेल्या २३ रुग्णांना पुढील आठवड्यात उपचारासाठी नाशिकच्या रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. पालघर रोटरी क्लबचे अध्यक्ष भगवान पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी मोमेज रईस, विलास पाटील, असिफ मेमान, डॉ. अविनाश सोनवणे, डॉ. जितेंद्र शिरनामे आणि एसएमबीटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. एसएमबीटी हॉस्पिटलच्या पल्लवी परदेशी यांच्या सहकार्याने हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97231 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..