पोलिसांच्या जनसंवादात तारपाचा ठेका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांच्या जनसंवादात तारपाचा ठेका
पोलिसांच्या जनसंवादात तारपाचा ठेका

पोलिसांच्या जनसंवादात तारपाचा ठेका

sakal_logo
By

कासा : बातमीदार
पोलिस दलाचा सामान्य जनतेशी चांगला सुसंवाद, समन्वय राहावा. तसेच पोलिस ठाणे हद्दीतील प्रत्येक गाव खेड्यात शांतता सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत कासा सूर्या नदीकिनारी पारंपरिक तारपा नृत्य स्पर्धा पार पडली.
जनसंवादाचा एक भाग म्हणून पोलिस ठाणे हद्दीत जिल्हास्तरीय पारंपरिक तारपा नृत्य स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मोखाडा, वाडा, जव्हार, तलासरी आणि पालघर येथील २९ तारपा संघांनी भाग घेतला. या स्पर्धेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील पारंपरिक नृत्य, चालीरीती यांना चालना मिळावी, तसेच समाजात असलेल्या वाईट रुढी, परंपरा नष्ट कराव्यात. तसेच आदिवासी समाजात होणारे बालविवाह, व्यसनाधीनता, विविध गैरसमज दूर व्हावेत, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. गेल्या काही दिवसांत कोसळणाऱ्या मुसळधार पावसातदेखील आदिवासी समाजातील नृत्य स्पर्धक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेसी, कासा पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी श्रीकांत शिंदे, माजी आमदार अमित घोडा, जिल्हा परिषद सदस्य लतिका बालशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
भाग घेतलेल्या २९ स्पर्धेकांना बक्षीसवाटप करण्यात आले. त्यातील तीन संघाना प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस देण्यात आले.

फोटो : जिल्हा पोलिस जनसंवाद अभियानांतर्गत तारपा नृत्य स्पर्धेतील विजेत्या संघाला पारितोषिक देताना पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97248 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..