महिलेला १३ वर्षांनंतर मिळणार हक्काचे घर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेला १३ वर्षांनंतर मिळणार हक्काचे घर
महिलेला १३ वर्षांनंतर मिळणार हक्काचे घर

महिलेला १३ वर्षांनंतर मिळणार हक्काचे घर

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १७ (बातमीदार) ः मुंबईत आपले हक्काचे घर असावे, यासाठी काही कुटुंब काबाडकष्ट करून घर मिळवण्याचा प्रयत्न करतात; मात्र अनेकदा विकसकांच्या फसवणुकीमुळे त्यांना घराचा ताबा मिळत नाही. त्‍यानंतर त्‍यांना कायद्याचा तसेच अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांचा आधार घ्यावा लागतो. अशाच एका महिलेला मनसे या राजकीय पक्षाचा आधार घेतल्‍याने तब्बल १३ वर्षांनंतर हक्काचे घर मिळणार आहे.
दीपाली हळदणकर–चव्हाण असे या महिलेचे नाव आहे. हिने २००९ मध्ये भांडुपमधील नामांकित विकसकामार्फत आंबिवली येथे दोन फ्लॅट बुक केले होते. दोन वर्षांत म्हणजेच २०११ मध्ये फ्लॅट मिळतील, असे विकसकाकडून सांगण्यात आले होते. मात्र २०२२ उजाडूनदेखील महिलेला घरासाठी विकसकाकडे फेरा घालाव्या लागत होत्या. विकसकाकडून कोणताच मार्ग सुटत नसल्याने दीपाली चव्हाण यांनी शेवटचा पर्याय म्हणून मनसेचे कामगार सेनेचे गजानन राणे व उपाध्यक्ष राज पार्टे यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली. मनसेच्या कामगार सेनेचे शिष्टमंडळ विकसकांना भेटले. त्‍यावर महिलेला अखेर १३ वर्षे रखडून असलेले आंबिवली येथील घरे दोन महिन्यात मिळवून देण्याचे आश्वासन विकसकाने दिले आहे. या वेळी महिलेने मनसेचे आभार मानले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97253 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..