राज्यपालांविरोधात शिवसेना आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपालांविरोधात शिवसेना आक्रमक
राज्यपालांविरोधात शिवसेना आक्रमक

राज्यपालांविरोधात शिवसेना आक्रमक

sakal_logo
By

विरार, ता. १७ (बातमीदार) : राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याबद्दल युवा सेना पालघर जिल्ह्यातर्फे जिल्हा सचिव भूमिष सावे आणि विधानसभा अधिकारी रोहन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी त्यांनी ‘दिल्लीतून पाठवलेला महाराष्ट्रातील कचरा दिल्लीत परत न्या’ या मागणीसाठी सर्व कचरापेट्यांवर राज्यपालांचा फोटो लावून त्यांना परत दिल्लीमध्ये पाठविण्याची मागणी करण्यात आली. याचा शुभारंभ वसई विरार म.वि.म.च्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख केतन पाटील, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, महिला आघाडी जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, युवा सेना सहसचिव व जिल्हा अधिकारी धनंजय मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97261 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..