युवकांचा वाचनाकडे कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवकांचा वाचनाकडे कल
युवकांचा वाचनाकडे कल

युवकांचा वाचनाकडे कल

sakal_logo
By

वसई, ता. १७ (बातमीदार) : तरुणाई इंटरनेटच्या गराड्यात अडकली असे वाटत असताना वसईत मात्र याला बगल देण्यात आली आहे. साहित्य जल्लोष कार्यक्रमात विविध पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. या वेळी महाविद्यायीन विद्यार्थ्यांची गर्दी पाहावयास मिळाली. वाचन हरपत चालले आहे असे जरी म्हटले जात असले, तरी साहित्य जल्लोषमध्ये याउलट चित्र पाहावयास मिळाले.
साहित्य जल्लोष कार्यक्रम गेली २० वर्षे सातत्याने सुरू आहे. या वेळी वाचनाकडे वळा असे आवाहन वेळोवेळी केले जाते. याला चांगला प्रतिसाद तरुणांकडून मिळत आहे. व्ही. के. बुक एजन्सी, डिंपल पब्लिकेशन्स व क्षेमकल्याणी बुक्स असे स्टॉल लावण्यात आले होते. आपल्या आवडीचे लेखक, कथा तसेच नवोदित लेखकांचे लेखन चाळता यावे म्हणून वाचकांनी गर्दी केली होती. गेल्या २० वर्षांपासून पुस्तकविक्रीचा व्यवसाय करत आहे. महाविद्यायीन मुलांचा पुस्तक वाचन करण्यासाठी खरेदी करण्याकडे कल वाढत आहे, असे व्ही. के. बुक एजन्सीचे गुरुनाथ शेट्ये यांनी सांगितले.
---
वसई : युवक पुस्तके हाताळताना

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97275 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..